(नंदुरबार) आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या रावलापाणी परिसराचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण आढावा घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि मा. आमदार राजेशदादा पाडवी यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान परिसरातील पर्यटन क्षमता, मूलभूत सुविधा आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले रावलापाणी हे आदिवासी संस्कृती, लोकपरंपरा आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल ठेवा आहे. या परिसराला पर्यटनाच्या नकाशावर अधिक प्रभावीपणे स्थान मिळावे, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच आदिवासी सांस्कृतिक वारसा जतन करत शाश्वत विकास साधता यावा, या उद्देशाने पाहणी करण्यात आली.
यावेळी रस्ते, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा, परिसर सुशोभीकरण तसेच पर्यटन विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांना समन्वयाने काम करून आवश्यक प्रस्ताव व नियोजन सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यास उपवनसंरक्षक तळोदा सुहास चव्हाण, सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशन, पंचायत समिती तळोदा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग (इलेक्ट्रिकल व बांधकाम), निवासी नायब तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन विकासाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच आदिवासी संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
#Ravalapani#TourismDevelopment#Nandurbar#DrMittaliSethi#RajeshPadvi#TribalCulture#Satpuda#EcoTourism#SustainableDevelopment#NandurbarDistrict#रावलापाणी#पर्यटनविकास#आदिवासीसंस्कृती#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#राजेशदादापाडवी#सातपुडा#ईकोटुरिझम#शाश्वतविकास