Home महाराष्ट्र श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम

श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम

0
Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji 350th Shaheed Samagam

समागमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शालेय उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी संगणकाच्या माध्यमातून माहिती संकलन, चित्रकला स्पर्धा व गुरु साहिबांच्या जीवनावर आधारित सादरीकरणे केली.

लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या त्याग, शौर्य आणि धर्मरक्षणाच्या संदेशाला साकार रूप दिले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी समागमाचे महत्त्व जाणून घेत प्रेरणादायी सहभाग नोंदविला.

या पवित्र समागमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मानवतेच्या या महान संदेशाला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

#khargharsamagam#ShahidiSamagam#navimumbai#guruteghbahadursahibji#kharghar