(नंदुरबार) कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व सेल्को फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शेतकरी व महिला उद्योजकांसाठी पॅकेजिंग व ब्रँडिंग विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले.
