Home सरकारी योजना बुरुड समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश – मंत्री संजय शिरसाट

बुरुड समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश – मंत्री संजय शिरसाट

Directives issued for positive action on the pending demands of the Burud community – Minister Sanjay Shirsat

बुरुड समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक असून कार्यवाही करण्याच्या सूचना सामाजिकन्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बुरुड समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने विविध मागण्यांबाबत आयोजित या बैठकीत बुरुड समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन मंत्री श्री. शिरसाट यांना सादर करण्यात आले.

बुरुड समाजाच्या मागण्यांमध्ये वन विभागाशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यासाठी वन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक आयोजित करावी, असे निर्देश मंत्री श्री. शिरसाट यांनी यावेळी दिले.

बैठकीस विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version