Home नंदुरबार जिल्हा शासकीय परिवहन सेवेतील रिक्त पदे भरण्यास गती देण्याचे निर्देश – मंत्री जयकुमार...

शासकीय परिवहन सेवेतील रिक्त पदे भरण्यास गती देण्याचे निर्देश – मंत्री जयकुमार रावल

Directives issued to expedite filling of vacant posts in the government transport service – Minister Jaykumar Rawal

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी वरळी येथील शासकीय परिवहन सेवेच्या कार्यालयास भेट देऊन कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पाहणी केल्यानंतर मंत्री रावल यांनी इमारतीच्या दुरुस्तीबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित प्रस्ताव सादर करावा, असे त्यांनी सांगितले.

तसेच विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीमान करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. शासकीय परिवहन सेवेच्या कार्यक्षमतेसाठी कंत्राटी वाहनचालकांची पदे भरण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विशेषतः अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या ताफ्यासाठी प्रशिक्षित शासकीय वाहनचालकांची आवश्यकता लक्षात घेता, वाहनचालकांची रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक भरती नियमांना (आरआर) मंजुरी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश मंत्री रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे उपस्थित होते.

Exit mobile version