Home धडगाव लोकसहभागातून चारा व वृक्षलागवडीचा अभिनव प्रयोग; सातपुड्यात शाश्वत विकासाला नवी दिशा

लोकसहभागातून चारा व वृक्षलागवडीचा अभिनव प्रयोग; सातपुड्यात शाश्वत विकासाला नवी दिशा

An innovative initiative for fodder and tree plantation through public participation; a new direction for sustainable development in the Satpuda region.

(नंदुरबार) धडगाव तालुक्यातील दुर्गम कुवरखेत येथे सामूहिक वन हक्क (CFR) क्षेत्रातसामुदायिक चारा व वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा उपक्रम आंतरराष्ट्रीय कुरण व पशुपालक वर्ष–२०२६ निमित्त आयोजित करण्यात आला.

डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार आणि भारतीय गवताळ प्रदेश व चारा संशोधन संस्था (IGFRI), धारवाड यांच्या संयुक्त विद्यमाने कुवरखेत व कात्री येथील CFR क्षेत्रात शेतकरी व ग्रामस्थांच्या सहभागातून चारा लागवड करण्यात येत आहे. महाराष्ट्रात लोकसहभागातून सामुदायिक चारा लागवडीचा हा अभिनव प्रयोग ठरत आहे.

सातपुड्यात पावसामुळे होणारी मातीची धूप रोखणे, पाण्याचे संवर्धन करणे, नैसर्गिक गवताळ क्षेत्राचे संरक्षण करणे आणि पशुधनासाठी वर्षभर चारा उपलब्ध करून देणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्देश आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी CFR क्षेत्राचे सामुदायिक सहभागातून शाश्वत व्यवस्थापन करण्यावर भर दिला. “चारा उपलब्धता – पशुधन उत्पादकता – पशुपालकांचे उत्पन्न” ही साखळी मजबूत करण्यासाठी ग्रामसभा, वनहक्क समिती, पशुपालक आणि विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच बांबू व बहुउपयोगी वृक्षलागवड, Fodder Mart आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार व उत्पन्नवाढीस मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

IGFRI, धारवाडच्या शास्त्रज्ञांनी योग्य गवत प्रजाती, लागवड तंत्रज्ञान, बियाणे व्यवस्थापन, चारा उत्पादन, कापणी व साठवणुकीबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी सामूहिक वनपट्ट्यात चारा व वृक्षलागवड केली. महिलांचा मोठा सहभाग हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

Exit mobile version