Home क्रीडा विभागीय हॉकी निवडीत नंदुरबारच्या सहा विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी!

विभागीय हॉकी निवडीत नंदुरबारच्या सहा विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी!

Six students from Nandurbar deliver a stellar performance in the divisional hockey selection!

(नंदुरबार) ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे येथे होणाऱ्या विभागीय हॉकी क्रीडा निपुणता केंद्रासाठी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबारच्या तब्बल सहा विद्यार्थिनींची निवड झाली आहे. दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या विभागीय निवड चाचणीत त्यांनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवले.

निवड झालेल्या विद्यार्थिनी:

कु. खुशी सुकलाल पावरा – इयत्ता १० वी

कु. विन्ता गिरीश वसावे – इयत्ता ९ वी

कु. परिधी राजेंद्र अहिरे – इयत्ता ९ वी

कु. प्रीती विश्वास वळवी – इयत्ता ८ वी

कु. सुप्रिया इंदाराम गावित – इयत्ता ८ वी

कु. अर्चना राजमल खर्डे – इयत्ता ८ वी

या यशाबद्दल प्रकल्प अधिकारीडॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी व शाळेच्या प्राचार्या ज्योती निरभवणे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

या यशामागे जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत राबविण्यात येणारे जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र (हॉकी), राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार व क्रीडा शिक्षक योगेश कुंभार यांचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थिनींची मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सराव यांचा मोलाचा वाटा आहे.

सहा विद्यार्थिनींची विभागीय स्तरावर झालेली निवड ही नंदुरबारच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या यशातून जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळत आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल क्रीडा व शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Exit mobile version