Home नंदुरबार जिल्हा सर्व विभागांची साप्ताहिक आढावा बैठक | नागरिकांच्या तक्रारींच्या तातडीने निपटाऱ्यावर भर

सर्व विभागांची साप्ताहिक आढावा बैठक | नागरिकांच्या तक्रारींच्या तातडीने निपटाऱ्यावर भर

Weekly review meeting of all departments | Emphasis on the prompt resolution of citizens' grievances

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची साप्ताहिक आढावा बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

‘आपले सरकार’ पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे नागरिकांशी थेट संबंधित असल्याने कोणतेही प्रकरण अनावश्यकपणे प्रलंबित राहू नये, यासाठी विभागप्रमुखांनी वैयक्तिक लक्ष देऊन विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले.

सेतू केंद्रांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या. सेतू केंद्र सुरू न ठेवणाऱ्या चालकांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

2011 पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमन करण्यासाठी ग्रामपंचायत व नगरपालिका निहाय माहिती सादर करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी तलाठी व ग्रामसेवकांनी संयुक्त मोहीम राबवावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

वनजमिनीअंतर्गत वाटप झालेल्या क्षेत्रांची मोजणी करून संबंधितांना 7/12 व 8-अ उतारे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्हा परिषदेकडील वृद्ध कलावंत मानधनाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देशही देण्यात आले.

नागरिकाभिमुख प्रशासन, वेळेत सेवा आणि प्रलंबित प्रकरणांचा प्रभावी निपटारा यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

Exit mobile version