Home टेक न्युज राजापूर बंदर व जहाजबांधणी प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश – मंत्री नितेश राणे

राजापूर बंदर व जहाजबांधणी प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश – मंत्री नितेश राणे

Directives issued to expedite the Rajapur port and shipbuilding project – Minister Nitesh Rane

रत्नागिरी जिल्ह्यातील तळसुंदे येथील राजापूर बंदर व प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाबाबत ‘अँड शुअर पोर्ट प्रा. लि.’ या कंपनीच्या वतीने मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी या प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

या प्रकल्पासाठी कंपनीने राजापूर येथे सुमारे १०० एकर जागा अधिग्रहित केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version