Home तळोदा महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रलंबित कामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे...

महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रलंबित कामांना गती देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे निर्देश

District Collector Dr. Mittali Sethi directs revenue officials to expedite pending work during a meeting.

(तळोदा) महसूल विभागातील विविध प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आज याहा मोगी सभागृह, सहायक जिल्हाधिकारी कार्यालय तळोदा भाग, तळोदा येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत नागरिकांशी थेट संबंधित विषयांना प्राधान्य देत कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पांदण रस्त्यांच्या मोजणीतील प्रलंबित व पूर्ण प्रकरणांचा ताळमेळ घेऊन नकाशाप्रमाणे रस्ते विकसित करण्याचे निर्देश.

महसूल व विविध फी वसुली, शिल्लक वसुली तसेच RRC वसुली गतिमान करण्याच्या सूचना.

शासकीय कार्यालयांची स्वच्छता, रंगरंगोटी, कंपाऊंड वॉल दुरुस्ती तसेच नागरिकांसाठी बैठक व्यवस्था व कचराकुंडी उपलब्ध करण्याचे निर्देश.

भूसंपादनातील प्रलंबित क.जा.प., तलाठी दप्तर तपासणी व फेरफार नोंदींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश.

ॲग्रीस्टॅक, ई-ऑफिस, वनपट्टाधारक ई-KYC व PM किसान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.

रास्त भाव दुकानांमधील ई-KYC वाढवून Mission Sudhar अंतर्गत लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश.

आदिवासी जमिनींच्या अवैध हस्तांतरणासंबंधी प्रकरणे, भूदान जमिनी, अकृषिक/औद्योगिक वापर तसेच कुळकायदा प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना.

शासकीय अन्नधान्य गोदामांची त्रैमासिक तपासणी करून नियमबाह्य धान्य वितरण करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश.

महसूल दावे व वाद सामोपचाराने सोडविण्यासाठी तालुकानिहाय महसूल लोकअदालती प्रभावीपणे आयोजित करण्याच्या सूचना.

नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम महसूल सेवा मिळावी, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि वेळेत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले.

Exit mobile version