Home शैक्षणिक दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणाचा उत्सव; नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत!

दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणाचा उत्सव; नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत!

0
A celebration of education in remote Toranmal; enthusiastic welcome to the new academic year!

शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या शुभारंभानिमित्त तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात प्रवेशोत्सव-आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.श्री.दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री मा.श्री.दादाजी भुसे यांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास आमदार मा.श्री.आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी बेड, पिण्याचे पाणी, सौरऊर्जा सुविधा, आरोग्य तपासणी, स्वसंरक्षण प्रशिक्षण, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भविष्यात तोरणमाळ येथे क्रीडा अकादमी उभारण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि नवोपक्रमाधारित ‘टॉप-नॉच’ शिक्षण देण्याचा प्रशासनाचा संकल्प व्यक्त केला. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रवेशोत्सव प्रेरणादायी ठरला.

#प्रवेशोत्सव2026#आनंदोत्सव#तोरणमाळ#नंदुरबार#शिक्षण_प्रथम#दादाजीभुसे#डॉमित्तालीसेठी#TribalEducation#StudentDevelopment#EducationForAll#Nandurbar#ViksitMaharashtra

#प्रवेशोत्सव2026#आनंदोत्सव#तोरणमाळ#नंदुरबार#शिक्षण_प्रथम#दादाजीभुसे#डॉमित्तालीसेठी#TribalEducation#MissionEducation#Nandurbar#StudentDevelopment#EducationForAll#ViksitMaharashtra#JilhaMahitiKaryalayaNandurbar