Home शैक्षणिक वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील शासकीय वैद्यकीय...

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढीव खाटांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला

0
A detailed review regarding the increased bed capacity in the state's government medical colleges was conducted during a meeting chaired by Medical Education Minister Hasan Mushrif.

बैठकीत राज्यातील रुग्णालयांमधील वाढता रुग्णभार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषांनुसार आवश्यक पदांची उपलब्धता आणि भविष्यातील गरजांवर चर्चा करण्यात आली.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णभाराच्या पार्श्वभूमीवर वाढीव खाटांनुसार आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यामुळे रुग्णसेवा अधिक सक्षम होण्याबरोबरच वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ताही उंचावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये दरवर्षी एक कोटीपेक्षा अधिक बाह्यरुग्णांना तसेच १० लाखांहून अधिक आंतररुग्णांना सेवा दिली जाते. या रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत आहे. त्यामुळे रुग्णसेवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि अध्यापन व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अतिरिक्त पदनिर्मितीची आवश्यकता निर्माण झाली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, संचालक पल्लवी सापळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते