Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य एलनिनो च्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य एलनिनो च्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.

A high-level meeting was held at the Sahyadri Guest House under the chairmanship of Chief Minister Devendra Fadnavis to review the situation in the state in the wake of possible El Nino.

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनांची कामे तातडीने आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण करावीत. या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच जुन्या जल स्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

पाणी बचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात यावे. जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित केली जावी, असेही निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

पशुधनासाठी चारा टंचाई होऊ नये याकरिता आतापासूनच उपाययोजना कराव्यत. एल निनोचा परिणाम इतर राज्यांवरही होण्याची शक्यता असल्याने बाहेरील राज्यांवर अवलंबून न राहता राज्यातच वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत. धरणांच्या बॅक वॉटर क्षेत्रात वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात यावा. मोठ्या प्रमाणात पशुधन असणाऱ्या तसेच चारा टंचाई जाणविणाऱ्या सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांमध्ये चारा उपलब्ध कसा होईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी, मदत व पुनर्वसन, वित्त, जलसंपदा, जलसंधारण, भारतीय हवामानशास्त्र विभाग, वित्त व नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#ElNino

error: Content is protected !!
Exit mobile version