
मुंबई(प्रतिनिधी):-शनिवार दि.15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिनेश कुरतडकर संकल्पित कोकणच्या लाल मातीतली पारंपरिक लोककला कलगीतुरा, जाखडी नाचाच्या जंगी सामन्याचे आयोजन मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर,गिरगाव येथे करण्यात आले आहे.
सदर सामन्यासाठी कलगीवाले गुरु गणपती महाराज घराण्यातील नामवंत शाहीर विनोद फटकरे शाखा वीर बंधू नृत्य कलापथक कळंबट (घवाळवाडी) विरुद्ध तुरेवाले मूळगादी बाबू रंगले घराण्यातील कवी, शाहीर विकास लांबोरे आणि संतोष कोलापटे यांचे नवोदित पट्टशिष्य युवा शाहीर कु. जनार्दन नाचरे शाखा जय बजरंगबली नृत्य कलापथक पन्हाळजे (कोंडवाडी) यांचा मनोरंजनात्मक सामना शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी रात्री ठीक 8 वाजता रंगणार आहे. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा सहकुटुंब सहपरिवार आस्वाद घ्यावा. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ८८५००७६००३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.