Home महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा एक अंतर्गत समाधान शिबिराचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा एक अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले

A Samadhan Camp was organized under Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp Mission Phase I.

सर्वसामान्य जनता व शेतकरी यांची महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदीची जनजागृती करणे आणि प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे आणि नागरिकांना सिंगल डे सर्विस डिलिव्हरीद्वारे सेवा पुरविणे हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

शारदा मंदिर हायस्कूल, हरिश्चंद्र गोरेगावकर मार्ग, जे.के टॉवर समोर गावदेवी, मुंबई येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिक, महिला यांना विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारे लाभ व सेवांचा सुद्धा समावेश करण्यात येणार असून इतर विभागाशी सुद्धा समन्वय करून त्यांच्या सेवांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version