
मुख्यमंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यातील स्फोटकांच्या कंपन्यांतील अपघातांच्या घटनांची अत्यंत गंभीर दखल घेऊन स्फोटकांशी संबंधित नियमात आवश्यक सुधारणांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्याचे सूतोवाच केले होते. त्याअनुषंगाने हे सादरीकरण करण्यात आले. यावेळी अभ्यास गटाचे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक ए.आर. सोनटक्के व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात मागील अडीच वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांतील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता ‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे. याच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत.
यामधील प्रमुख शिफारशी