Home नंदुरबार जिल्हा एकाच वेळी दुर्दैवी अंत; अस्तंबा यात्रेतून परतताना भीषण अपघातात मैत्रीचा शेवट

एकाच वेळी दुर्दैवी अंत; अस्तंबा यात्रेतून परतताना भीषण अपघातात मैत्रीचा शेवट

A tragic end at the same time; Friendship ends in a terrible accident while returning from the Astamba Yatra

तळोदा (जि. नंदुरबार) : सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनाला काल (शनिवारी ता १८) सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Nandurbar Accident News) आठ जण ठार, तर २८ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तळोदा-धडगाव रस्त्यावर चांदसैली घाटात ही घटना घडली. अपघातातील (Nandurbar Accident News) मृत आणि जखमी हे नंदुरबार तालुक्यातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये पवन गुलाब मिस्तरी (२४), बापू धनगर (२४), चेतन पावबा पाटील (२३), भूषण गोसावी (३०) वाहनचालक राहुल गुलाब मिस्तरी (२३, सर्व रा. घोटाणे), योगेश लक्ष्मण ठाकरे (२८), हिरालाल जगन भिल (३८, रा. कोरीट), गणेश संजय भिल (१३, रा. शबरी हट्टी, नंदुरबार) यांचा समावेश आहे.धनत्रयोदशीनिमित्त सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामाची यात्रा भरते. या रस्त्यावर घाटाच्या वळणावर (Nandurbar Accident News)चालकाचा अचानक ताबा सुटल्याने वाहन घाटाखाली कोसळल्याने वाहनात बसलेल्यांना काही कळायच्या आत ते दाबले गेले. त्यामुळे जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच जवळच्या घट्ट मैत्री असलेल्या मित्रांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी या यात्रेवेळी काढलेले ते शेवटचे फोटो पाहून हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version