Home शहादा शहादा येथे दिव्यांगांसाठी आधार कार्ड अद्ययावत शिबिरास प्रारंभ

शहादा येथे दिव्यांगांसाठी आधार कार्ड अद्ययावत शिबिरास प्रारंभ

Aadhar card updating camp for the disabled begins at Shahada

(शहादा) राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ, जिल्हा शाखा नंदुरबार व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्याने शहादा येथे दिव्यांग बांधव व भगिनींसाठी आधार कार्ड अद्ययावत (Update) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर प्रकाश रोड, नवीन भाजी मंडईजवळ, शहादा येथे सुरू असून नंदुरबार जिल्ह्यात दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेले आहे.

या शिबिराचे आयोजन श्री. राजाभाऊ कुवर (जिल्हा अध्यक्ष) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. शिबिर यशस्वीरीत्या राबविण्यासाठी जिल्हा आधार केंद्र प्रमुख मा. श्री. जयेश खैरनार यांचे मार्गदर्शन तसेच श्री. संदीप नाना बिराडे (सेतू आधार केंद्र संचालक, शहादा) व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या उपक्रमामुळे दिव्यांग व्यक्तींना आधार कार्डमधील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, बायोमेट्रिक माहिती आदी अद्ययावत करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असून, त्यांना विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. शिवाजीराव मोरे (राज्य उपाध्यक्ष), श्री. राजाभाऊ कुवर (जिल्हा अध्यक्ष), श्री. अरविंद शिंदे (जिल्हा उपसरचिटणीस), सौ. सुनिताताई कुवर (जिल्हा महिला समन्वयक) आणि श्री. सुधाम लोहार यांनी सर्व दिव्यांग बांधव व भगिनींना केले आहे.

या उपक्रमामुळे दिव्यांग सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले असून, जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी अशा अधिक उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

(Collector Office Nandurbar)

#aadhaarupdatecamp#राष्ट्रीयदिव्यांगविकासमहासंघ#InclusiveDevelopment

error: Content is protected !!
Exit mobile version