
शहादा येथे आयोजित ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०२६ मध्ये कृषी विभागाने प्रभावी सहभाग नोंदवला असून, शेतकरी बांधवांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन व प्रत्यक्ष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
प्रदर्शन स्थळी उभारण्यात आलेल्या कृषी विभागाच्या स्टॉलवर शेतकऱ्यांना महाकृषिविस्तार AI ॲप डाऊनलोड करून देण्यात येत असून, त्याचा उपयोग कसा करावा याबाबत सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात आहे. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) बाबत सविस्तर माहिती देण्यात येत असून, या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी तयार केलेली उत्पादने विक्रीसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सुलभरीत्या उपलब्ध व्हावी यासाठी QR Code च्या माध्यमातून माहिती देण्याची अभिनव पद्धत राबविण्यात येत आहे. यासोबतच MahaDBT पोर्टल अंतर्गत अर्ज प्रक्रिया, पात्रता व लाभ याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना यांसह कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले जात आहे.
प्रदर्शनामध्ये श्री. के. एस. वसावे, तालुका कृषी अधिकारी, श्री. एस. बी. बागुल, मंडळ कृषी अधिकारी, श्री. एम. बी. सौंदाणे, उप कृषी अधिकारी, श्री. ए. ए. महिरे, उप कृषी अधिकारी तसेच शहादा मंडळातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवून तंत्रज्ञान, नवकल्पना व शासकीय सहाय्य यांचा प्रभावी संगम घडवून आणत आहे.
(Collector Office nandurbar)