Home आरोग्य आदर्श ग्राम अभियान – जय नगर व तळवे येथे आरोग्य व पोषण...

आदर्श ग्राम अभियान – जय नगर व तळवे येथे आरोग्य व पोषण दिन कार्यक्रम संपन्न

Adarsh ​​Gram Abhiyan – Health and Nutrition Day program concluded at Jai Nagar and Talve

आदर्श ग्राम अभियानांतर्गत उपकेंद्र जय नगर आणि उपकेंद्र तळवे येथे ग्राम आरोग्य व पोषण दिनानिमित्त गर्भवती माता, प्रसूतिपश्चात माता (PNC), तसेच 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांची सविस्तर आरोग्य तपासणी व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

उपकेंद्र जय नगर –

कार्यक्रमात उपस्थित गर्भवती व PNC मातांची खालील तपासण्या करण्यात आल्या:

HB तपासणी

युरिन टेस्ट (Albumin/Protein)

BP तपासणी

BSL (Blood Sugar Level)

वजन व उंची मोजणी

तसेच मातांना आयर्न-फॉलिक अॅसिड (IFA), कॅल्शियम गोळ्या, टिटानस (TT)/TD इंजेक्शन दिले गेले. यासोबतच SAM/MAM बालकांची तपासणी, पोषण स्थितीचे मूल्यमापन, आणि बालक सुदृढ कसे राहतील याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व माता भगिनी उपस्थित होत्या.

उपकेंद्र तळवे –

ग्राम आरोग्य पोषण दिनानिमित्त सर्वांगीण आरोग्य तपासणी:

गर्भवती व PNC मातांची HB, BP, BSL, युरिन, वजन-उंची तपासणी

आयर्न-फॉलिक अॅसिड, कॅल्शियम गोळ्या वितरित

ANC मातांना TD इंजेक्शन

0–5 वर्षे बालकांचे लसीकरण

आरोग्य पथकाने मातांना योग्य आहार, पोषण, गर्भावस्थेतील काळजी, बालकांच्या वाढ व विकासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, माता व बालके सहभागी झाली.

उद्दिष्ट — निरोगी माता, निरोगी बालक, निरोगी गाव

आदर्श ग्राम अभियानांतर्गत राबविलेले हे उपक्रम माता व बाल आरोग्य सुधारण्यासाठी, पोषण स्थिती मजबूत करण्यासाठी आणि कुपोषण निर्मूलनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत आहेत.

[Adarsh ​​Gram Abhiyan]

error: Content is protected !!
Exit mobile version