Home शेती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘शेतकरी परदेश अभ्यास दौरा’ या योजनेच्या माध्यमातून रवाना झालेल्या शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘शेतकरी परदेश अभ्यास दौरा’ या योजनेच्या माध्यमातून रवाना झालेल्या शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या.

0
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘शेतकरी परदेश अभ्यास दौरा’ या योजनेच्या माध्यमातून रवाना झालेल्या शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा दिल्या.
Agriculture Minister Dattatreya Bharane wished the farmers who left through the 'Farmer Study Tour Abroad' scheme through a video call.

परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे त्यांनी आवाहन केले.

२०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित असून त्यात युरोप, इस्राईल आणि मलेशिया,व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या तीन देशांचा एकत्रित अभ्यासदौरा आयोजित केला आहे. सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, संरक्षित शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञान, तसेच विविध देशांतील कृषी व्यवस्थापन व विपणन व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी, १ कृषी विभाग अधिकारी तसेच १ प्रवासी कंपनी प्रतिनिधी दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

#अभ्यासदौरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here