Home नंदुरबार जिल्हा अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०२६ — गौरवाचा क्षण

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०२६ — गौरवाचा क्षण

Agroworld Agricultural Exhibition 2026 — A Moment of Glory

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील प्रगत शेतकरी, महिला उद्योजक व कृषी क्षेत्रातील नवोपक्रम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला शेतकरी व संस्था मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कृषी, पशुपालन, सेंद्रिय शेती, मूल्यवर्धन व आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर आधारित विविध दालने या प्रदर्शनात उपलब्ध होती.सदर कार्यक्रम मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार येथील श्रीमती रमिला वसावे,व्यवस्थापक,तोरणा लोक संचलित साधन केंद्र,धडगाव व श्रीमती दीपमाला पाटील,अध्यक्ष प्रेरणा लोक संचलित साधन केंद्र नंदुरबार यांना कृषी क्षेत्र मध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल गौरविण्यात आले.

या कार्यक्रमामुळे शेतकरी व महिला उद्योजकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली तसेच स्वतःच्या व्यवसायासाठी नवी दिशा मिळाली. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण गाव, गट व परिसरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना मिळून आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ मिळते.

error: Content is protected !!
Exit mobile version