
विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने भारतीय नागरिक, पर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
विविध आखाती देशात अडकलेल्या प्रवाशांना याबाबत सहाय्य व अधिक माहितीसाठी संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात संपर्क साधावा, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या (SEOC) वतीने देण्यात आली आहे.