Home महाराष्ट्र आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रभावित झालेली विमान सेवा व...

आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रभावित झालेली विमान सेवा व विमान उड्डाणे सुरू झाली आहेत.

Air services and flights, which were affected in the past few days due to the war-like situation in the Gulf countries, have resumed.

विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने भारतीय नागरिक, पर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

विविध आखाती देशात अडकलेल्या प्रवाशांना याबाबत सहाय्य व अधिक माहितीसाठी संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात संपर्क साधावा, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या (SEOC) वतीने देण्यात आली आहे.

#विमानसेवा

error: Content is protected !!
Exit mobile version