Home आरोग्य आरोग्यविषयक सर्व माहिती आभा कार्डद्वारे डिजिटल स्वरुपात – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यविषयक सर्व माहिती आभा कार्डद्वारे डिजिटल स्वरुपात – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

All health information in digital form through Abha Card – Health Minister Prakash Abitkar

मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांचे आभा अकाउंट तयार करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरू आहे. या अकाउंटमुळे नागरिकांनी पूर्वी केलेल्या तपासण्या, उपचार, औषधे व लसीकरणाची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या “डिजिटल हेल्थअकाउंट कार्ड”मुळे संपूर्ण आरोग्यविषयक माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस डॉ. सुनील कुमार बरनवाल (सीईओ, एनएचए), डॉ. पंकज कुमार अरोरा (डारेक्टर, एबीडीएम,)राज्याचे आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सहसंचालक डॉ.सुनीता गोल्हाईत यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासन विविध आरोग्य योजना प्रभावीपणे राबवत असून, एबीडीएम च्यामाध्यमातून महाराष्ट्र डिजिटल हेल्थ क्षेत्रातही चांगली कामगिरी करेल असा विश्वास केंद्रीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) च्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या आरोग्य व्यवस्थेत अभूतपूर्व परिवर्तन घडत असून, महाराष्ट्र आरोग्य विभागही “डिजिटल आरोग्य क्रांती”साकारण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आयुष्यमान भारत डिजिटल मिशन प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version