(नंदुरबार) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने व राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देऊन सर्व शासकीय व खाजगी रुग्णालय येथे रुग्ण हक्काची सनद लावण्या संदर्भात आदेश करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. (All hospitals in Nandurbar district should be ordered to install The Charter of Patients Rights)
सविस्तर असे कि, राज्यातील सरकारी खाजगी रुग्णालयमध्ये रुगणांच्या हक्काची सनद ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) हि सनद मानवी हक्क आयोग भारत सरकार यांनी दि. 13 जानेवारी 2020 रोजी त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशीत केली आहे ही सनद जशीच्या तशी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी स्विकारलेली आहे तसेच सदर सनद सर्व राज्य सरकार यांनी पाठवलेली आहे तसेच राज्य सरकारनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थे मार्फत प्रत्येक हॉस्पिटल मध्ये लागु करावी असे निर्देशही केंद्र सरकारने दिलेले आहे. आता राज्य सरकार्नेही रुग्णालयांना फर्मान सोडले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय झाल्याने आरोग्य विभागाने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. परंतु संपुर्ण नंदुरबार जिल्हातील कोण्त्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या रुग्णहक्कांची सनद ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) दर्शनी भागात लावल्याचे दिसुन येत नाही.
कोण्त्याही पुर्व अटी न लावता व उपचार सुरु करण्याचा आगोदरच पैशाच्या मागणी न करता पहिल्यांदा पेशंटला सर्वोत्तम, सुरक्षापुर्व व दर्जेदार तसेच तातडीने वैधकीय सेवा देवून पहिल्यांदा रुग्णांचा जीव वाचविणे हॉस्पिटल व डॉक्टरांचे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या कलम 21 प्रमाणे प्रत्येक भारतीयांना जगण्याचा अधिकार आहे.तो अधिकार कोण्त्याही अपत्कालीक परिस्थीतीत प्रधान्याने सुरक्षीत राहिला पाहिजे यासाठे रुग्णांच्या हक्काची सनद लावणे अत्यंत गरजेचे आहे.
पुरेशी माहिती मिळण्याचा हक्क, आजाराचा प्रकार, त्यांची कारणे तपासण्यांचे तपशील, काळजी,उपचारांचे परिणाम, त्यामुळे होणारी गुंतागुंत आणि अपेक्षीत खर्च, रुग्णांच्या नोंदी, केसपेपर तपासण्यांचे अहवाल आणि सविस्तर बिले मिळण्याचा हक्क, उपचारासाठी माहितीपुर्ण संमतीचा हक्क, रुग्णाने निवडलेल्या डॉक्टरांकडुन सेकंड ऑपिनियन मागविण्याचा हक्क, उपचारांदरम्यान गोपनियता, खाजगीपणा तसेच मानवी प्रतिष्ठा जपण्याचा हक्क, पुरुष डॉकरांकडून महिला रुग्णांची तपासणी होत असताना स्त्री कर्मचारी व नातेवाईक सोबत असणाचा हक्क, पर्यायी एचआयव्ही बधित असल्यास भेदभाववरहीत उपचारांचा आणि वागणुकीचा हक्क, पर्याही उपचारपद्धती निवडण्याचा हक्क हे रुग्णहक्क सनद ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) मध्ये असणे अपेक्षीत आहे, तरी सदरील रुग्णांच्या हक्कांच्या सनदी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व खाजगी व सरकारी हॉस्पिटलने अघ्याप लावलेल्या नसल्याने आपण या रुग्ण हक्कांची सनद ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावण्याचे सर्व सरकारी व खाजगी हॉस्पिटल यांना त्वरीत आदेश द्यावेत व त्याबाबत उपाय योजना राबवाव्यात. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष जयेश बागुल, जिल्हा कार्यध्यक्ष सईद कुरेशी, संपर्क प्रमुख महा. जितेंद्र भोई, जिल्हा प्रचार प्रमुख विशाल महाजन आदी उपस्थित होते.