Home महाराष्ट्र वसई पश्चिम येथील चार वर्षीय निरागस बालकाला मारहाण झाली

वसई पश्चिम येथील चार वर्षीय निरागस बालकाला मारहाण झाली

An innocent four-year-old child was beaten up in Vasai West.

उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. सध्या या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याचे पालकांनी सांगितले.

३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सोसायटीच्या आवारात मित्रांसोबत खेळत असलेल्या विघ्नेश अतुल कोंढारे (वय ४) या बालकाला मारहाण झाली. या मारहाणीत विघ्नेशच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

या घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत विशेष बाब म्हणून मदत करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या सूचनांनुसार संबंधित रुग्णास तत्काळ आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

सध्या विघ्नेशवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोफत उपचार सुरू आहेत. या मदतीबद्दल विघ्नेशचे वडील अतुल कोंढारे म्हणाले, “मुख्यमंत्री सहाय्यता निधीने केलेल्या मदतीबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत. या सहाय्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि आता विघ्नेशची प्रकृती स्थिर आहे.”

गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

#मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी

error: Content is protected !!
Exit mobile version