Home महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पशुधनाच्या झालेल्या हानीचा व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा...

राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पशुधनाच्या झालेल्या हानीचा व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

Animal Husbandry Minister Pankaja Munde reviewed the damage caused to livestock due to #heavyrains and floods in the state and the action taken accordingly at the Ministry.

अतिवृष्टी व पुरामुळे मृत जनावरांच्या मालकांना योग्य ती शासकीय मदत मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महसूल विभागाशी समन्वय साधावा, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात जनावरांसाठी फिरती पशुवैद्यकीय पथके सक्रिय करून तत्काळ सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

बाधित भागातील जनावरांचे संरक्षण, मृत जनावरांची नोंद तसेच आवश्यक मदत पुरवण्याबाबतचे निर्देशही मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

error: Content is protected !!
Exit mobile version