
अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीतून राज्यस्तरासाठी नागपूर येथे निवड
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग मार्फत देवगिरी विभागातुन स्पर्धाकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला होता. याच्यातून उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत आणशील मामा सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची देवगिरी विभागात निवड करण्यात आली. व राज्यस्तरीय होणाऱ्या स्पर्धेत नागपुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड करण्यात आलेली आहे. आदिवासी संस्कृती जोपासणाऱ्या अंशील मामा सोंगाड्या पार्टीच्या सर्व कलाकारांचे समन्वयक श्री. लक्ष्मण गावीत सर, श्री. अशोक पाडवी, श्री. कांतीलाल वसावे, श्री. कल्पेश मावची, श्री. संदीप वळवी, श्री. राजु गावीत तसेच आदिवासी सहकारी मित्र परिवारातर्फे या सर्व कलाकारांचे अभिनंदन तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.