नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार या विभागांतर्गत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना भुरीवेल या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, सद्यास्थितीत पाणी पातळी 107.00 मी.ची नोंद झाली आहे. त्या अन्वये सदर प्रकल्पात 100% क्षमतेने पाणी साठा झाला असुन सदर प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालु झाला आहे. तरी सुकी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की, सुकी नदी काठावरील गावांलागत असलेल्या भुरीवेल, थुवा, आमपाडा, गडद, खाटीजांबी व इतर गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये गुरढोरे सोडू नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्राजवळी जावू नये, तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
