Home महाराष्ट्र ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे ६ एकर जागेवर २० लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.

ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे ६ एकर जागेवर २० लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.

0
ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे ६ एकर जागेवर २० लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.
Brookfield has announced the construction of a massive project with 2 million square feet of leasehold construction on a 6-acre site in Powai, Mumbai.

अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार २० वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणार असून, यामध्ये १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे तसेच ३०,००० हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) व ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली भागीदार बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. ही उभारणी महाराष्ट्रातील गुंतवणूकदार-अनुकूल वातावरणाबाबत जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी आहे. प्रकल्पासाठी १०० टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून इमारत बाजारातील सर्वोत्तम शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हब म्हणूनचे स्थान आणखी मजबूत होणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

#Brookfield

#Infrastructure

#GCC

#RealEstate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here