Home शेती ‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023’ साठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023’ साठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Gopal Ratna Award-2023

(नवी दिल्ली) केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी  प्रदान केला जाणारा राष्ट्रीय ‘गोपाल रत्न पुरस्कार’ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नॅशनल अवॉर्ड पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज  15 ऑगस्टपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. ( Call for applications of ‘National -2023’ till 15th September)

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 : https://awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत

दूध उत्पादक शेतकरी, दूग्ध सहकारी संस्था, दूध निर्मिती कंपनी (एमपीसी), दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कार केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्यावतीने प्रदान केला जातो. यासाठी इच्छुकांनी  https://awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 : देशी गायी-म्हशींमध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची क्षमता

शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध व्हावी, केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त असून त्यांच्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर 2014 मध्ये ‘राष्ट्रीय गोकुळ अभियान’ (आरजीएम) सुरु करण्यात आले. या अंतर्गत देशी गायी- म्हशींवर संशोधन आणि दूध क्षमता वाढविण्यासाठी संशोधन केले जाते.

वर्ष 2023 या वर्षासाठी  विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये देशी गाई अथवा म्हशींचे पालन करणारा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी सोबत जोडली आहे), सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था (डीसीएस)/ दूध निर्मिती कंपनी (एमपीसी)/दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना (एफपीओ), सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) अशी श्रेणी केली आहे.

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 : राष्ट्रीय दुग्ध दिवसाचे औचित्य साधून  26 नोव्हेंबर 2023 रोजी या पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 प्राप्त पहिल्या दोन विभागांसाठी म्हणजेच सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट डीसीएस/ एफपीओ/ एमपीसी यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम दिली जाईल. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी रु.5,00,000/- (पाच लाख रुपये) तर द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी  रु.3,00,000/-(तीन लाख रुपये) पारितोषिक दिले जाईल.

सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) विभागासाठी पहिल्या तिन्ही क्रमांकांच्या पुरस्कारामध्ये केवळ गुणवत्ता प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह  यांचा समावेश असेल. राष्ट्रीय दुग्ध दिवसाचे औचित्य साधून  26 नोव्हेंबर 2023 रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

Gopal Ratna Awards

या पुरस्कारांसाठी आवश्यक पात्रता आणि  ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींचे तपशील जाणून घेण्यासाठी  https://awards.gov.in  किंवा  https://dahd.nic.in संकेतस्थळांना भेट द्यावी.

गायींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)

S.N.BreedHome Tract
1AmritmahalKarnataka
2BachaurBihar
3BargurTamilnadu
4DangiMaharashtra and Madhya Pradesh
5DeoniMaharashtra and Karnataka
6GaolaoMaharashtra and Madhya Pradesh
7GirGujarat
8HallikarKarnataka
9HarianaHaryana, Uttar Pradesh and Rajasthan
10KangayamTamilnadu
11KankrejGujarat and Rajasthan
12KenkathaUttar Pradesh and Madhya Pradesh
13KherigarhUttar Pradesh
14KhillarMaharashtra and Karnataka
15Krishna ValleyKarnataka
16MalviMadhya Pradesh
17MewatiRajasthan, Haryana and Uttar Pradesh
18NagoriRajasthan
19NimariMadhya Pradesh
20OngoleAndhra Pradesh
21PonwarUttar Pradesh
22PunganurAndhra Pradesh
23RathiRajasthan
24Red KandhariMaharashtra
25Red SindhiOn organized farms only
26SahiwalPunjab and Rajasthan
27SiriSikkim and West Bengal
28TharparkarRajasthan
29UmblacheryTamilnadu
30VechurKerala
31MotuOrissa,Chhattisgarh and Andhra Pradesh
32GhumusariOrissa
33BinjharpuriOrissa
34KhariarOrissa
35PulikulamTamilnadu
36KosaliChhattisgarh
37MalnadGiddaKarnataka
38BelahiHaryana and Chandigarh
39GangatiriUttar Pradesh and Bihar
40BadriUttarakhand
41LakhimiAssam
42LadakhiJammu and Kashmir
43Konkan KapilaMaharashtra and Goa
44PodaThurpuTelangana
45NariRajasthan and Gujarat
46DagriGujarat
47ThuthoNagaland
48Shweta KapilaGoa
49Himachali PahariHimachal Pradesh
50PurneaBihar
51KathaniMaharashtra
52SanchoriRajasthan
53MasilumMeghalaya

म्हशींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)

Sr. NoBreedHome Tract
1BhadawariUttar Pradesh and Madhya Pradesh
2JaffarabadiGujarat
3MarathwadiMaharashtra
4MehsanaGujarat
5MurrahHaryana
6NagpuriMaharashtra
7Nili RaviPunjab
8PandharpuriMaharashtra
9SurtiGujarat
10TodaTamilnadu
11BanniGujarat
12ChilikaOrissa
13KalahandiOdisha
14Luit (Swamp)Assam and Manipur
15BargurTamil Nadu
16ChhattisgarhiChhattisgarh
17GojriPunjab and Himachal Pradesh
18DharwadiKarnataka
19MandaOdisha
20PurnathadiMaharashtra
error: Content is protected !!
Exit mobile version