
वेबसाईटवर सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने प्रसिद्धी निवेदनाद्वारे केले आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेची गुणपडताळणी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली असून, दोन्ही प्रक्रिया उमेदवारांना विशिष्ट मुदतीत पूर्ण करावयाच्या आहेत.
या परीक्षेची गुणपडताळणी/रिस्पॉन्स शीट ही https://mscepune.in/DTEDOLA/KP2026 ResponseSheet.aspx या लिंकवर १६ ते ३१ मार्च पर्यंत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठीचे शुल्क प्रती पेपर रुपये ५००/- असून ते सदर लिंकद्वारे भरावे लागणार आहे. शुल्क भरल्यानंतर १५ दिवसात उमेदवारांच्या ई-मेल वर रिस्पॉन्स शीट उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.