Home महाराष्ट्र राज्यपालांच्या स्व-गणनेने राज्यातील जनगणनेचा आरंभ

राज्यपालांच्या स्व-गणनेने राज्यातील जनगणनेचा आरंभ

Census in the state begins with Governor's self-enumeration

मुंबई: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलेल्या स्व-गणेनेने देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा ‘जनगणना 2027’ चा महाराष्ट्रातील औपचारिक आरंभ आज लोकभवन मुंबई येथे करण्यात आला.

महाराष्ट्र स्थापना दिनी जनगणना सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी राज्यातील जनतेला जनगणनेच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

ही स्व-गणना दिनांक 1 ते 15 मे या कालावधीत होणार असून त्यानंतर जनगणना कर्मचारी घरोघरी जाणार आहेत. ही स्व-गणना प्रत्येक नागरिकाला स्वतःला करायची असून त्यामध्ये 33 प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. अवघ्या दहा मिनिटात स्व-गणना करता येते असे सांगून राज्यातील 2.6 लाख कर्मचारी जनगणना करणार असल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिली. 

यावेळी राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा,  राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उप महानिबंधक ए. एन. राजीव, उप महानिबंधक यशवंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version