Home तळोदा महसूल सप्ताह 2025 अंतर्गत तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान”

महसूल सप्ताह 2025 अंतर्गत तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान”

“Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Abhiyan” was successfully implemented in Taloda taluka under Revenue Week 2025

(नंदुरबार) महसूल विभागामार्फत सध्या सुरु असलेल्या महसूल सप्ताह 2025 अंतर्गत आज तळोदा तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” प्रभावीपणे राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत तळोदा, सोमावल, बोरद आणि प्रतापपूर या महसूल मंडळांमध्ये एकाच दिवशी बहुविध सेवा शिबिरे आयोजित करण्यात आली.

या शिबिरांमधून नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत प्रशासनाने जनतेशी थेट संपर्क साधला.

शिबिरातील महत्त्वाच्या सेवा व सुविधा:

⦁ संजय गांधी योजना मंजुरी आदेश वाटप व नवीन अर्ज स्वीकारणे

⦁ जात, उत्पन्न, अधिवास प्रमाणपत्रे, विवाह दाखले, जन्म-मृत्यू दाखले वाटप

⦁ जिवंत सातबारा उतारा व शिधापत्रिका वाटप व eKYC

⦁ कृषी विभागमार्फत ॲग्रीस्टॅक आयडी नोंदणी, KCC अर्ज व नवीन बँक खाते उघडणे

⦁ सिकलसेल तपासणी – आरोग्य विभागातर्फे

⦁ शाळाबाह्य मुलांचे आधार अद्ययावत – विधी व न्याय विभाग

⦁ शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले वाटप

सहभागी विभाग:

या शिबिरात महसूल विभागासोबतच कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, बँक, CSC केंद्रे, ग्रामपंचायत यंत्रणा इत्यादी विभागांनी स्टॉल लावून नागरिकांना सेवा दिल्या.

संपूर्ण शिबिरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

या अभियानामुळे प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद वाढतो, गरजू नागरिकांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचतो आणि ‘प्रशासन आपल्या दारी’ या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी होते, हे पुन्हा अधोरेखित झाले.

#महसूल_सप्ताह#छत्रपती_शिवाजी_महाराज_महाराजस्व_अभियान#Nandurbar#taloda#revenueweek#governanceatdoorstep#PublicServiceDelivery#DigitalIndia#Egovernance

error: Content is protected !!
Exit mobile version