Home नंदुरबार जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शिबिर उत्साहात संपन्न; विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला

छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शिबिर उत्साहात संपन्न; विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला

1
Chhatrapati Shivaji Maharaj Self-Respect Camp concludes enthusiastically; citizens benefit from various schemes.

(नंदुरबार) महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेला बळ देणारे **”छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शिबिर”** संत श्री गजानन महाराज मंदिर सांस्कृतिक सभागृह, नंदुरबार येथे उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन **डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार**, श्रीमती. रत्नाताई रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार नगरपरिषद, श्री. विजय चौधरी, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य, अपर जिल्हाधिकारी श्री धनंजय गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उपविभागीय अधिकारी श्री बंडू कापसे यांनी मार्गदर्शन केले.

विविध विभागांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देत नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. तसेच अनेक लाभार्थ्यांना योजनांचे प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आले.

**प्रमुख लाभ वितरण :**

प्रधानमंत्री आवास योजना – **१८** लाभार्थी

कुंभार समाज ओळख प्रमाणपत्र – **५२** लाभार्थी

अंत्योदय रेशनकार्ड – **१५६** लाभार्थी

सिकलसेल अपंग कार्ड – **१०** लाभार्थी

आयुष्मान भारत कार्ड – **१२** लाभार्थी

स्वामित्व योजनेअंतर्गत सदनिका – **१२** लाभार्थी

संजय गांधी व इंदिरा गांधी योजनांतर्गत **२७६** लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण.

**जिवंत सातबारा मोहिमेत** विविध प्रकारच्या नोंदी कमी करून नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला. तसेच महिला वारस नोंदी, स्वतंत्र ७/१२ तयार करणे आणि इतर महसुली प्रकरणांमध्येही महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यात आली.

नागरिकांना शासनाच्या योजनांचा पारदर्शक व वेळेवर लाभ मिळावा, प्रशासन अधिक संवेदनशील व नागरिकाभिमुख व्हावे, असा संदेश मान्यवरांनी यावेळी दिला.

.

.

.

#नंदुरबार#छत्रपतीशिवाजीमहाराजस्वाभिमानशिबिर#डॉमित्तालीसेठी#महाराष्ट्रशासन#लोकाभिमुखप्रशासन#शासनआपल्यादारी#जनकल्याण#महसूलविभाग#आयुष्मानभारत#प्रधानमंत्रीआवासयोजना#स्वामित्वयोजना#सिकलसेलअभियान#नंदुरबारजिल्हा