
परिषदेसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून मॅग्नेटिकमहाराष्ट्र अधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६’ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.