भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना विठ्ठल-रखुमाई, पंतप्रधान नरेंद्र मोदींना छत्रपती शिवाजी महाराज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सिद्धीविनायक, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वीर सावरकर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांना गाय वासरू अशा ५ वेगवेगळ्या मूर्ती भेट देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आगळे दर्शन घडविले…
