
‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ स्पर्धेतील यशस्वी पथ!
नंदुरबार जिल्ह्यातील एक छोटसं गाव – बोरवण, लोकसंख्या अवघी 365, मात्र शैक्षणिक दृष्टिकोनात भव्य आणि समृद्ध! येथे स्थित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या शिक्षण, स्वच्छता, हरित परसबाग आणि डिजिटल प्रगतीच्या अनोख्या मिश्रणाचे जिवंत उदाहरण बनली आहे.
परिवर्तनाची सुरुवात:
सन 2022-23 मध्ये मुख्याध्यापक दिलीप गावीत व सहशिक्षक रमेश गावीत यांनी शाळेवर रुजू होताच विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षण, स्वच्छता व हरित वातावरण तयार करण्याचा संकल्प केला.
लोकसहभागातून उभारले गेले भविष्य:
गावाच्या मर्यादित साधनसंपत्ती असूनही लोकसहभागातून ₹5 लाखांचे निधी संकलन करण्यात आले. याच माध्यमातून वर्गखोल्या दुरुस्ती, भित्तीचित्र, स्पार्टेक्स, डेस्क, डिजिटल सुविधांची भर घालून शाळेचा चेहरामोहरा बदलण्यात आला.
हरित शाळा आणि पोषण परसबाग:
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आणि उमेद संस्थेच्या सहकार्याने साकारलेल्या 18 ट्रक लाल मातीच्या परसबागेतून विद्यार्थी मिरची, टमाटे, कोथिंबीर, तूर, मायक्रोग्रीन्स अशा मायक्रोग्रीन सलाडचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात केला जातो.
तसेच पर्यावरणपूरक विचारातून झाडांनी तयार केलेली नैसर्गिक संरक्षण भिंत आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून शाळा हिरवीगार ठेवली जाते.
स्पर्धा आणि गौरव:
याच निधीतून स्वतंत्र डायनिंग हॉल, टेबल-खुर्ची, स्लाइडिंग खिडक्या व स्टोअर रूम उभारण्यात आली आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक प्रगती:
या यशामागे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. भानुदास रोकडे यांचे मार्गदर्शन व पाठबळ महत्त्वाचे ठरले. त्यांचे वेळोवेळी मिळालेले प्रोत्साहन हे शिक्षकांसाठी ऊर्जा ठरले आहे.
बोरवण शाळा आज ग्रामीण भागातील शिक्षण, स्वच्छता, पोषण आणि लोकसहभागाचा आदर्श नमुना ठरत आहे.
#बोरवणशाळा#nipunnmaharashtra#sustainableschools#digitaleducation#inspirationalschool