Home महाराष्ट्र राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या शेवटच्या सहा दिवसांमध्ये तपासणी मोहीम अधिक काटेकोरपणे करा

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या शेवटच्या सहा दिवसांमध्ये तपासणी मोहीम अधिक काटेकोरपणे करा

Conduct more stringent inspection campaigns in the last six days of Rahuri Assembly by-elections

अहिल्यानगर – राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीस अवघे सहा दिवस शिल्लक असताना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षपणे व संवेदनशीलतेने काम करावे. तपासणी मोहीम अधिक काटेकोरपणे करण्याचे निर्देश खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांनी दिले.

​राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित खर्च आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, लेखाधिकारी श्री. नागरे, उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

​खर्च निरीक्षक व्ही. कुमार म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. अवैध रोकड व मद्य वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे. मतदारांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन दिले जात नाही ना, याची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

​एफएसटी, व्हीएसटी व एसएसटी पथकांनी अधिक सक्रिय राहून मतदारसंघात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी. तसेच ‘पेड न्यूज’च्या अनुषंगाने माध्यमांतील बातम्यांवर सतत लक्ष ठेवावे व समाज माध्यमांवरून राजकीय पक्षांकडून करण्यात येणाऱ्या प्रचारावरही बारकाईने नजर ठेवावी. प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची तपासणी करूनच जाहिरातींना पूर्वप्रमाणीकरण देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, निवडणूक कायदे व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून प्रभावी कामकाज करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

#RahuriByePoll#ElectionMonitoring#ElectionExpense#ModelCodeOfConduct#StrictInspection#AhilyanagarElection#PaidNewsWatch#StaticSurveillance#FlyingSquad#FST#SST#VST#TransparencyInElection#VoterAwareness#NoBribeForVote#राहुरी_पोटनिवडणूक#निवडणूक_आचारसंहिता#FreeAndFairElection#MaharashtraElection2026

error: Content is protected !!
Exit mobile version