
या उपक्रमासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आता १६ जानेवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर यांच्यामार्फत घेण्यात येणारे परीक्षापूर्व १५ दिवसांचे ऑनलाईन संविधान प्रशिक्षण १८ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, यामध्ये इयत्ता ८ वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.