मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी टोकरतलाव शिवार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा आणि जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचा सविस्तर आढावा घेतला. या दौर्यात त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व अधिष्ठाता यांच्यासोबत बैठक घेऊन पुढीलप्रमाणे महत्त्वाच्या सूचना केल्या:
रुग्णालय प्रशासनात गती येण्यासाठी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी समन्वय ठेवावा आणि समस्यांचे त्वरित निवारण करावे.
रुग्णालयातील पाणीपुरवठा, बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन व किरकोळ बांधकामांचा नियमित आढावा घेण्यासाठी प्रत्येकी दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांची नावे व संपर्क क्रमांक जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे आदेश.
जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेज यंत्रणा ही जुन्या २०० खाटांच्या आधारावर असल्याने सद्यस्थितीत वाढलेल्या रुग्णसंख्येस अनुसरून नव्याने ड्रेनेज लाइन टाकण्याचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावे, असेही निर्देश दिले गेले.
क्रिटिकल केअर ब्लॉकच्या बांधकामासाठी MIDC कडून मिळालेली एक एकर जागा तात्काळ ताब्यात घेऊन २१ जुलैपासून बांधकाम सुरू करण्याचे आदेश ठेकेदारास दिले गेले. तसेच, MRI युनिटसाठी आवश्यक बंकर, ट्रायबल रिसर्च सेंटर व कर्करोग रुग्णालयासाठी MIDCच्या इतर जागा हस्तांतरित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले गेले.
टोकरतलाव शिवारात ५६/२ व ५८ या सर्वे क्रमांकातील खाजगी जमीन उपलब्ध नसल्यास पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी जमीनधारकांची सहमती घेण्याची सूचना करण्यात आली. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत प्रशासकीय व तांत्रिक बाबी पूर्ण करून संपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
बांधकाम पूर्ण होईपर्यंत (२ वर्षे) टोकरतलाव परिसरात पिण्याचे व वापरण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाईपलाईनसाठी तात्काळ कार्यवाहीचे आदेश.
हाईट्स कंपनीला संपूर्ण बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी निर्देश देत कोणत्याही विलंबास तडजोड केली जाणार नाही याची खातरजमा करण्याचा आदेश.
या बैठकीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अधिष्ठाता, MIDC प्रतिनिधी आणि ठेकेदार उपस्थित होते.

#nandurbarsmartcity#medicalcollege#DistrictHospital#InfrastructureDevelopment#healthcareupgradation#criticalcareblock#midc#PublicHealth#MaharashtraGovt