Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू!

नंदुरबार जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू!

Curfew and arms embargo imposed in Nandurbar district!

संपूर्ण #नंदुरबार जिल्ह्यात अंमलबजावणी !

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी शिवजयंती उत्सव , दहावी-बारावीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थिती मुळे जिल्हा प्रशासनाने 14 दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

आदेशातील महत्त्वाचे नियम:

शस्त्रबंदी : तलवारी, लाठ्या, बंदुका किंवा कोणतेही घातक हत्यारे बाळगण्यास मनाई.

जमावबंदी : पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी.

मिरवणुका व घोषणा : कोणत्याही प्रकारच्या मोर्चा किंवा भाषणांवर निर्बंध.

विशेष सवलती:

वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींना : लाठी वापरण्यास परवानगी.

शासकीय कर्मचाऱ्यांना : अधिकृत कर्तव्यांसाठी शस्त्र बाळगण्याची मुभा.

विवाह सोहळे, अंत्ययात्रा आणि आठवडे बाजार : यांना सवलत.

संपूर्ण जिल्ह्यात कडक अंमलबजावणी!

आदेशाचे उल्लंघन केल्यास : कायदेशीर कारवाई होईल.

स्थानिक पोलीस विभाग : योग्य ती कारवाई करणार.

नागरिकांनी शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे नागरिकांना आवाहन :

नियमांचे काटेकोर पालन करा

विद्यार्थ्यांसाठी शांततामय वातावरण निर्माण करा

सामाजिक सलोखा टिकवून ठेवा

#NandurbarPolice#शिवजयंती2025#ExamTime#PeaceAndOrder#StaySafe#मराठीसमाज#MaharashtraPolice#NoViolence#CommunitySafety

error: Content is protected !!
Exit mobile version