कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत महोत्सवा’चे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत दु. १२ ते रात्रौ ९.३० या वेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी दिली.
महाराष्ट्र सदनात डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या ‘महाराष्ट्र खाद्य महोत्सवा’ला दिल्लीकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, आता हिवाळी हंगामाची मेजवानी म्हणून ‘हुरडा पार्टी’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा आणि चवीचा आनंद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त आर विमला आणि गुंतवणूक निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले आहे.
