
बँकेच्या मदतीसाठी कॅबिनेटसमोर प्रस्ताव आणला जाईल, असे त्यांनी सांगितले. याबाबत अवसायक, प्रशासक आणि एमसीसी बँकेने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सहकारी बँकेने व्याजदर कमी करून बीड जिल्हा बँकेला ५ ते ७ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, चालू हंगामातील पीक कर्ज वाटपाची स्थिती आणि शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी घेतला.
राज्य बँकेकडे प्रलंबित असलेले बँकेचे विविध प्रस्ताव आणि शासनाकडून मिळणारा प्रलंबित व्याज परतावा लवकरात लवकर वर्ग करण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच बँकेच्या कृषी आणि अकृषिक कर्जदारांची सद्यस्थिती जाणून घेतली.
बैठकीस आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आदी उपस्थित होते.