Home महाराष्ट्र दक्षिण मुंबई विभागातील अनधिकृत शाळा व वर्ग बंद करण्याचे निर्देश

दक्षिण मुंबई विभागातील अनधिकृत शाळा व वर्ग बंद करण्याचे निर्देश

0
दक्षिण मुंबई विभागातील अनधिकृत शाळा व वर्ग बंद करण्याचे निर्देश
Directives to close unauthorized schools and classes in the South Mumbai division.

मुंबई : दक्षिण मुंबई विभागातील काही शाळा व शाळांमधील काही वर्ग अनधिकृतरीत्या चालविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी संबंधित शाळांना नोटीस बजावून अनधिकृतरीत्या चालविण्यात येत असलेल्या शाळा व वर्ग तात्काळ बंद करण्याबाबत निर्देश दक्षिण मुंबई विभागाच्या शिक्षण निरीक्षक यांनी दिले आहेत.

या सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. एकही वर्गास मान्यता नसलेल्या मुंबईतील अनधिकृत शाळांमध्ये मदनी हायस्कूल (क्रॉफर्ड मार्केट, मस्जीद), युसुफ मेहर अली हायस्कूल (नारायण तावडे चौक, तुळशीवाडी ताडदेव), मदर तेरेसा हायस्कूल (ब्लॉक नं 11, 90 फिट, धारावी), गणेश विद्यामंदीर (संत कक्कैया मार्ग, धारावी), ऑक्झिलम इंटरनॅशनल स्कूल (बलराम बाबू खाडेकर मार्ग, वडाळा पूर्व) फिनलँड इंटरनॅशनल स्कूल (माहेश्वरी निकेतन, गोपालराव देशमुख मार्ग) यांचा समावेश आहे.

अनधिकृतरित्या वर्ग चालविण्यात येत असलेल्या मुंबईतील शाळांमध्ये मोहम्मदीया हायस्कूल (27 मस्जीद मार्ग) येथील इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग अनधिकृत आहेत. या शाळेत इयत्ता 1 ली ते 5 वी व 9 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गांनाच मान्यता आहे. गोल्डन स्पायरल हायस्कूल, परेल (4 बी, ॲडव्हान्स्ड हाऊस, ताडदेव) या शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतचे वर्ग अनधिकृत आहेत. येथील इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतच्या वर्गांनाच मान्यता आहे, असे शिक्षण निरीक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here