Home महाराष्ट्र राज्य आपत्ती संचालन केंद्र (एसईओसी) येथून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी...

राज्य आपत्ती संचालन केंद्र (एसईओसी) येथून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

Disaster Management Minister Girish Mahajan reviewed the situation from the concerned officials from the State Disaster Operations Centre (SEOC).

आखातातील नऊ देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली असून महाराष्ट्र शासनाने या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, अडकलेल्या नागरिकांची सुरक्षितता व त्यांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली.

आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची अचूक माहिती मिळावी, त्यांच्याशी थेट संपर्क साधता यावा आणि गरज पडल्यास तातडीने मदत पोहोचवता यावी, यासाठी शासनाने विशेष ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे.

https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ ⁠ या ‘सहायता’ पोर्टलवर संबंधित नागरिक किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती भरावी, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version