Home लाईफस्टाईल शैक्षणिक वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत माजी विद्यार्थ्यां च्यावतीने स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप

वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत माजी विद्यार्थ्यां च्यावतीने स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप

0
वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत माजी विद्यार्थ्यां च्यावतीने स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप
Distribution of sports dress by former students at Zilla Parishad Center School in Vanyavihir

(अक्कलकुवा) तालुक्यातील वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खेळाचा पोशाख (स्पोर्ट ड्रेस) भेट दिला यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, सतीश माहेश्वरी, कांतीलाल पाडवी, नरेश पाडवी, केंद्रप्रमुख साठे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बाबूलाल बुवा, सतपाल वळवी मुख्याध्यापक विलास पवार, कृष्णा गावित, योगेश्वर बुवा ,मनोज चौधरी, जीवन शिंदे ,राजेंद्र सोनी यांच्या हस्ते या स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले.
         अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचे माजी विद्यार्थी तथा जिल्हा परिषद शिक्षक मनोज चौधरी सामाजिक कार्यकर्ते जीवन शिंदे यांच्या आपल्या शाळेविषयी असलेला ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी शिक्षण घेतलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे कल्पक उद्देशाने या केंद्रशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना २६ जानेवारी २०२६ रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला स्पोर्ट ड्रेसचे वाटप केले हे ड्रेस चिमुकल्या विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांसह ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. या विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस वाटपासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी, जितेंद्र पाडवी, माजी उपसरपंच निलेश जैन, हरिभाऊ सैंदाणे ,राजेंद्र सोनी, योगेश माहेश्वरी, मेजर माहेश्वरी, पंकज पवार आदींनी आर्थिक योगदान दिल्याने माजी विद्यार्थी मनोज चौधरी व जीवन शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जावरे यांनी केले या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here