Home नंदुरबार जिल्हा जिल्हा प्रशासन नंदुरबारचा अभिनव उपक्रम : ‘अस्तित्व – भिली AI प्रकल्प’चे राज्यस्तरीय...

जिल्हा प्रशासन नंदुरबारचा अभिनव उपक्रम : ‘अस्तित्व – भिली AI प्रकल्प’चे राज्यस्तरीय लोकार्पण

District Administration Nandurbar's innovative initiative: State-level inauguration of 'Astitva - Bhili AI Project'

नंदुरबार जिल्हा प्रशासनाची संकल्पना, नियोजन व प्रभावी अंमलबजावणीमधून साकार झालेल्या ‘अस्तित्व – भिली AI प्रकल्प’ चा लोकार्पण सोहळा दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित Global Conference on AI in Agriculture and Investor Summit 2026 (AI4Agri) दरम्यान पार पडला. दुपारी ३ ते ४ या विशेष सत्रात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभिनव प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने भारतातील पहिले भिली AI मॉडेल विकसित करून ते Mahavistaar AI App मध्ये यशस्वीरित्या समाकलित केले आहे. आदिवासी समुदायांच्या मातृभाषेला आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडत डिजिटल समावेशनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल नंदुरबार जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भिली भाषेत शेतीविषयक मार्गदर्शन, हवामान माहिती, शासकीय योजनांची माहिती तसेच विविध सेवा सहज उपलब्ध होणार आहेत. तंत्रज्ञानाचा लाभ थेट गावपातळीपर्यंत पोहोचवून समावेशक आणि शाश्वत विकास साध्य करण्याचा जिल्हा प्रशासनाचा हा ठोस प्रयत्न आहे.

या परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील २० प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून भिली AI मॉडेलचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रातील वापर, स्थानिक भाषेतील मार्गदर्शन व डिजिटल साधनांचा प्रभावी उपयोग याबाबत त्यांना सखोल माहिती मिळाली.

या मॉडेलच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या भिली भाषेत शेतीविषयक सल्ला, हवामान अंदाज, शासकीय योजना तसेच विविध सेवा सहज उपलब्ध होणार आहेत. तंत्रज्ञानाचा लाभ थेट गावपातळीपर्यंत पोहोचवून समावेशक व शाश्वत विकासाला चालना देण्याचा हा जिल्हा प्रशासनाचा ठोस प्रयत्न आहे.

यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील इतर आदिवासी भाषांसाठीही अशाच प्रकारचे कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

या अभिनव उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांच्या पुढाकारामुळे संकल्पनेपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास शक्य झाला. हा उपक्रम महाराष्ट्र शासन, Bhashini, PoCRA, Mahavistaar, जिल्हा प्रशासन नंदुरबार आणि Karya यांच्या संयुक्त विद्यमाने साकार झाला असून जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, समन्वयक व स्थानिक प्रतिनिधी, निती फेलो क्षितिजा देशमुख व स्थानिक भाषा तज्ज्ञांचे मोलाचे योगदान लाभले.

‘स्थानिक भाषा – स्थानिक ज्ञान – आधुनिक तंत्रज्ञान’ या त्रिसूत्रीवर आधारित नंदुरबार जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम आदिवासी सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.

CMOMaharashtra

#Astitva#BhiliAI#AI4Agri2026#TribalEmpowerment

error: Content is protected !!
Exit mobile version