
(नंदुरबार)
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट देऊन विविध सुविधा, सेवा आणि रुग्णांची स्थिती यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीमध्ये त्यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक आणि रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सेठी यांनी इंजेक्शन रूममध्ये सॅनिटायझर व हँडवॉशच्या उपलब्धतेबाबत चौकशी केली तसेच औषधसाठ्याची स्थिती जाणून घेतली. आवश्यक असल्यास तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश दिले.
स्त्री शौचालये बंद अवस्थेत आढळल्याने तत्काळ दुरुस्ती व स्वच्छतेच्या उपाययोजनांची सूचना दिली.
पुरुष कक्षामध्ये स्त्री व बालक रुग्ण भरती केल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत रुग्ण वर्गीकरण योग्य पद्धतीने करण्याचे आदेश दिले. स्तनपान करणाऱ्या मातांना गोपनीयता मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन ब्लड स्टोरेज युनिटचे उद्घाटन डॉ. सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण द्यावे अशी सूचना करण्यात आली.
ऑपरेशन थिएटरमध्ये नियोजित सिझेरियन सेवा सुरू करण्यासाठी भुलतज्ज्ञांची आवश्यकता जिल्हा शल्यचिकित्सकांनी पूर्ण करावी अशी सूचना करण्यात आली.
SNCU मध्ये भरती असलेल्या अर्भकांच्या मातांशी संवाद साधत गरोदरपणातील शारीरिक श्रमांबाबत माहिती घेतली. विभागासाठी वॉशिंग मशीनची मागणीही मान्य करण्यात आली.
वस्त्रधुलाई सेवा अपुरी असलेल्या संस्थेचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
सर्व लिपिक वर्गासाठी “कॅम्फो नंदुरबार” येथे एक दिवसीय प्रशिक्षणाचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.
कार्यक्षमतेचे कौतुक:
डॉ. मित्ताली सेठी यांनी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. जिल्हा शल्यचिकित्सकांनीही सर्व टीमचे मनोबल वाढवले व टीमवर्कने कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
#NandurbarHealthCare#AkkalkuwaRuralHospital#DistrictCollectorVisit#MaternityCare#BloodStorageUnit#TeamworkInHealth#DrMittaliSethi#PublicHealthNandurbar